*एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीसांना,नंदुरबार येथे आदिवासी तरुण जय वळवी याची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीसांना,नंदुरबार येथे आदिवासी तरुण जय वळवी याची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत निवेदन*
*एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीसांना,नंदुरबार येथे आदिवासी तरुण जय वळवी याची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत निवेदन*
तळोदा(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथे एक आदिवासी तरुण जय राजू वळवी याच्यावर आरोपीने पूर्वनियोजितपणे स्कुटीने येऊन चाकूने पोटावर वार केला. त्या घटनेनंतर त्यास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, यामध्ये मुख्य आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे तसेच चेतन चौधरी सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल व निष्पक्ष चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी, तसेच, मुख्य आरोपीविरुद्धचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्यास कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. सदर प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, यावेळी संघटनेचे ॲड गणपत पाडवी, तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, गोपी पावरा, मुकेश पाडवी, कल्पेश पाडवी, गेंदू वसावे आदी उपस्थित होते.