*जी. टी. पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय एकात्मता: आत्मनिर्भर व विकसित भारताचा मार्ग कार्यशाळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय एकात्मता: आत्मनिर्भर व विकसित भारताचा मार्ग कार्यशाळा संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय एकात्मता: आत्मनिर्भर व विकसित भारताचा मार्ग कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अजिवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता: आत्मनिर्भर व विकसित भारताचा मार्ग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवी जळगाव डॉ. एम. जे.रघुवंशी हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात राष्ट्रीय एकात्मता कशा पद्धतीने विकसित भारताचा कणा आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. याप्रसंगी हिंदी विषयाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शर्मा यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेतून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न कसे साकार होणार हे समजून सांगितले. दुसरे प्रमुख वक्ते पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गौतम कुवर यांनी विकसित भारताचा मार्ग या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. एम. आर. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी बी देवरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. विजय चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. जी एच बळदे, डॉ. एस व्ही मिश्रा, डॉ. वाय व्ही मराठे डॉ. एन पी हुसे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.