*शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना समाज सेविका प्रिती पालिकर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना समाज सेविका प्रिती पालिकर*
*शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन करतांना समाज सेविका प्रिती पालिकर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा किक-बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हास्तरीय शालेय किक-बॉक्सिंग स्पर्धेचे उद्धघाटन समाज सेविका प्रिती पालिकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की मुलींनी आत्मनिर्भर व निडर राहणे गरजेचे आहे. मार्शल आर्टस सारख्या खेळात मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. स्वतःचे आत्म -संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टस सारखे खेळ मुलींनी शिकणे अत्यंत आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उद्धघाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, मुख्य प्रशिक्षिका योगिता बैसाने, निता मराठे, क्रीडा प्रशिक्षक उमेश राजूपत, मदर तेरेसा इंग्लिश स्कूल चे क्रीडाशिक्षक संतोष मराठे, प्रमोद बैसाने, विवेक पालिकर, मंगलदास पाटील, गणेश मराठे आदी उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून पवन बिऱ्हाडे, प्रतीक खंडेलवाल, अमित पाडवी, विशाल सोनवणे गणेश गोसावी यांनी काम केले. 14 वर्षा आतील मुलींमध्ये कोमल शिंदे प्रथम तर 17 वर्षा आतील मुलींमध्ये रोशनी आहेर प्रथम 19 वर्षा आतील मुलींमध्ये वैष्णवी अहिरे प्रथम आल्या. तसेच 14 वर्षा आतील मुलांमध्ये 35 ते 40 किलो वजन गटात समर्थ बडगुजर प्रथम, तनय सोपनार, धिरज पावरा, मुकुंदराज नाईक प्रथम आले 17 वर्षा आतील 40 ते 45 किलो वजन गटात यशवंत वसावे प्रथम, सुमित चौधरी, उमेर खान सुमित तावडे प्रथम आले. सर्व विजयी खेळाडूंची निवड धुळे येथे होणाऱ्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सूत्र संचालन गणेश मराठे यांनी केले तर आभार योगिता बैसाने मॅडम यांनी मानले.