*आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी 14 बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न-नंदकुमार पैठणकर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी 14 बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न-नंदकुमार पैठणकर*
*आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी 14 बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न-नंदकुमार पैठणकर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारचा वित्तीय सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक समावेशन (Financial Inclusion) वाढवण्यासाठी आणि नागरिकांना बँकिंग सेवांची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे नुकतेच एक भव्य संयुक्त शिबीर घेण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी एका शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये कळविली आहे
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांच्या हस्ते झाले, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक रजनीश सिंह हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंदके अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर आदि मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या भाषणात सर्व बँकांनी एकत्र येऊन हे शिबीर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी बँकांना डिजिटल फसवणुकीच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक रजनीश सिंह यांनी आरबीआय लोकपाल योजनेची (RBI Ombudsman Scheme) माहिती दिली, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकिंग तक्रारींचे निराकरण करण्यास मदत होईल.
विशेष मार्गदर्शन सत्र
या शिबिरात बँक प्रतिनिधींनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन केले:
स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र माचेरला यांनी ग्राहकांना Re-KYC चे महत्त्व आणि प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक प्रभात कुमार यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सामाजिक सुरक्षा योजना जसे की प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) याबद्दल मार्गदर्शन केले, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या योजनांचा लाभ घेऊ शकतील. बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंह आणि एसएलबीसी (SLBC) प्रतिनिधी यांनी डिजिटल फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. नागरिकांसाठी बँकिंग सेवांचा स्टॉल
नंदुरबार शहरातील 14 विविध बँकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. प्रत्येक बँकेने आपला स्टॉल उभारून ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये नवीन बँक खाते उघडणे, Re-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आणि इतर बँकिंग सुविधांची माहिती देणे अशा सेवांचा समावेश होता. या शिबिरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने फिरते एटीएम (Mobile ATM) आणि किओस्क सेवा देखील उपलब्ध करून दिली, ज्यामुळे ग्राहकांना तात्काळ व्यवहार करणे शक्य झाले.
या शिबिराचे आभारप्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक संतोषकुमार सोनी यांनी केले. नंदुरबार शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचेही जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पैठणकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.