*जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानअंतर्गत जिल्हा प्रोसेस लॅब (DPL) ची सुरवात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानअंतर्गत जिल्हा प्रोसेस लॅब (DPL) ची सुरवात*
*जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानअंतर्गत जिल्हा प्रोसेस लॅब (DPL) ची सुरवात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-18 सप्टेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील तालुका मास्टर ट्रेनर यांचे प्रशिक्षण म्हणजेच जिल्हा प्रोसेस लॅब ची सुरुवात करण्यात आली. भारत सरकारची सुरु असलेली योजना धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान च्या अंतर्गत शासनाने काही दिवसांपूर्वी “आदी कर्मयोगी” अभियान सुरु केले आहे. विविध विभागाच्या 25 योजना 717 गावांमध्ये प्रत्येक आदिवासी कुटुंबांना तसेच सेवा, समर्पण आणि संकल्प या त्रिसूत्रीच्या आधारे 20 लाख चेंज लीडर तयार करणे व शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक आदिवासी योजनेचा लाभ देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 12 जिल्हा मास्टर ट्रेनर हे राज्य स्तरावरून प्रशिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी एक दिवशीय जिल्हा अभिमुखता कार्यक्रम आयोजन करून यामध्ये सर्व जिल्हा स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. आता तीन दिवशीय तालुका मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले आहे. यामध्ये वनविभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, पुरवठा विभाग, विद्युत विभाग, कृषी, महिला बालविकास, बांधकाम, पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, आरोग्य, पशुसंवर्धन, आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभाग आदी विभागाचे प्रत्येक तालुक्यातून मास्टर ट्रेनर उपस्थित होते.
जिल्ह्यात 2 अक्टोबर पर्यंत या 717 गावांमध्ये जाऊन सहभागी ग्राम कृती आराखडा बनविण्याचे लक्ष असल्याने तालुका मास्टर ट्रेनर प्रशिक्षित होऊन गावांचे क्लस्टर तयार करून विलेज स्तरावर कार्यशाळा आयोजित करतील. प्रत्येक गावांमध्ये आदी सहयोगी आणि आदी साथी असे विविध लोकांची निवड करून हे अभियान यशस्वी करायचे आहे. हे अभियान आदिवासी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचे असल्याने यामध्ये कोणताही व्यक्ती वंचित राहणार नाही या उद्देश्याने काम करणे व ग्राम कृती आराखडा हा सहभागी पद्धतीने बनविणे आवश्यक असल्याने मत अनय नावंदर यांनी व्यक्त केले. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मधील सर्व विभाग एकात्मिक पद्धतीने काम करतील व आदिवासी कुटुंबांना प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन आदिवासी विकास विभाग सोबत काम करतील असे मत नमन गोयल यांनी व्यक्त केले. हे अभियान जगातील व देशातील सर्वात मोठे अभियान असून याला मिशन मोडमध्ये घेऊन जाने प्रत्येकाचे काम आहे. यासाठी आदिवासी विकासविभाग सोबत इतर यंत्रणा यांनी स्वतःचे काम म्हणून सर्व योजना देणे अपेक्षित आहे.
या कार्याशाळेला नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अनय नावंदर प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तळोदा , शिवांश सिंग सहा. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा लेवल मास्टर ट्रेनर, आदिवासी विकास विभागाचे सर्व अधिकारी, विविध विभागाचे मास्टर ट्रेनर उपस्थित होते.