*शताब्दी फार्मसी कॉलेजमध्ये नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह-दुसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा उत्साहात साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी फार्मसी कॉलेजमध्ये नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह-दुसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा उत्साहात साजरी*
*शताब्दी फार्मसी कॉलेजमध्ये नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह-दुसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह 2025 च्या दुसऱ्या दिवशी, विद्यार्थ्यांमध्ये औषधांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी "औषधांच्या दुष्परिणामांची नोंद – एक सामाजिक जबाबदारी" या विषयावर आपले विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणे, केस स्टडीज व आकडेवारीचा आधार घेत प्रभावी सादरीकरण केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दगडू पाटील, प्रा.भूषण गोपाळ, प्रा. कल्याणी चौधरी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे आयोजन फार्माकोलॉजी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जागृती शेवाळे यांनी केले, तसेच बी. फार्म आणि डी. फार्म चे विद्यार्थी हेमांगी सोनावणे, दर्शिका वळवी, कावेरी पावरा, ऋतुजा अहिरे, श्रुती सोनार, वैष्णवी चित्ते, प्राची चौधरी, रविना वसावे, यशराज परमार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. भावना वसावे, पूजा गायकवाड, प्रा. हेमलता वाडिले, प्रा. रोहिणी पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. वसंत चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धात्मक व्यासपीठच नव्हे, तर औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल जागरूकता निर्माण करणारे शिक्षणात्मक माध्यम ठरले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी कौतुक केले.