*नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव*
*नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील काकासाहेब ही. म. चौधरी विद्यालयातील हॉलमध्ये नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था, नंदुरबार व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पूजन व माल्याअर्पण करून गुणवंत 72 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय सैंदाणे होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संजय सोनवणे गटविकास अधिकारी शहादा, गिरीश महाले सहायक उपनिबंधक शहादा, नितीन चव्हाण पीएसआय विसरवाडी प्रमुख वक्ते प्रवीण पाटील कौटिल्य अकॅडमी नंदुरबार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांनी केली यावेळी संजय सोनवणे गटविकास अधिकारी शहादा यांनी आपल्या मार्गदर्शनात ध्येय निश्चित करण्याचे व ध्येय साध्य करण्यासाठी सतत कष्ट करण्याचे आवाहन केले. नितीन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच प्रवीण पाटील यांनी विद्यार्थी जीवनात मोबाईलपासून लांब राहण्याचे आवाहन केले व मोबाईलचे दुष्परिणाम उदाहरणासह सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ मीनाक्षी भदाणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली. यावेळी दहावी बारावी व वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी यांच्या कलागुणाची संस्थेतर्फे सन्मान चिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी सौ. मीनाक्षी भदाणे, नाभिक संस्था महिला अध्यक्ष सौ. जयश्री निकम, संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद निकम, नितीन मंडलिक, कोषाध्यक्ष शिवाजी मिस्त्री, सहसचिव छगन भदाणे, प्रसिद्धीप्रमुख प्रकाश देवरे, सल्लागार ओंकार शिरसाठ, गुलाबराव पवार, प्रभाकर शिरसाठ, प्रकाश सोनवणे, प्रवीण वरसाळे उपस्थित होते. दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बसविण्यात आले तसेच सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर बोरसे, बिजलाल अहिरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस विभागात निवड झालेल्या कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे आजीवन सदस्य मनीषा निकम, नीलिमा चित्ते, अनिल भदाणे, नरेंद्र महाले, अर्जुन महाले, जीवन जाधव, नितीन भदाणे प्रकाश शेंगदाणे भाईदास बोरसे, राजेंद्र सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ, समाधान सैंदाणे, प्रा. डॉ. विजय सैंदाणेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव हिमांशू बोरसे यांनी मानले.