*सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नये, अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांना भारत आदिवासी संविधान सेनेचे निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नये, अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांना भारत आदिवासी संविधान सेनेचे निवेदन*
*सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नये, अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांना भारत आदिवासी संविधान सेनेचे निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (ST)आरक्षण न देणेबाबत निवेदन सादर करण्यात येत आहे की बंजारा समाज अनुसूचित जमाती (ST) हैद्राबाद गेझेटनुसार आरक्षण देण्यात यावे ही मागणी करीत आहे, यासाठी आंदोलन करत आहेत, आदिवासी समाज हा जल, जंगल जमीनचा निसर्ग पूजक समाज असून, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर नि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलेले आहे, बंजारा समाज हा आदिवासी नसून फिरता समाज म्हणून ओळखला जातो, बंजारा समाज आधीपासून इतर मागास वर्गीय (OBC) प्रवर्गमध्ये आरक्षणचा लाभ घेत आहे, महाराष्ट्र प्रवर्गच्या सूचीमध्ये कुठलाही उल्लेख नाही महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नये, अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदतून देण्यात आला आहे. निवेदनावर भारत आदिवासी संविधान सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे यांच्यासह राजकुमार वळवी, राजेश मोरे, किरण ठाकरे, सिताराम वळवी, सुनील पवार, विकास वळवी, आनंद सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.