*पुणे येथील राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट व रिल्स स्पर्धेत "एकटाच" या आमच्या लघुपटास जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुणे येथील राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट व रिल्स स्पर्धेत "एकटाच" या आमच्या लघुपटास जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक*
*पुणे येथील राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट व रिल्स स्पर्धेत "एकटाच" या आमच्या लघुपटास जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा पुणे येथील राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट व रिल्स स्पर्धेत "एकटाच" या आमच्या लघुपटास जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'अजितपर्व फिल्म फेस्टिवल' पुणे येथे आयोजित केले होते या स्पर्धेत डॉ. खुशालसिंग राजपुत दीग्दर्शित व सुभद्रा इंटरटेन्मेंट निर्मित शॉर्ट फिल्म" एकटाच" ला जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले सदर पारितोषिक सिने अभिनेते दिग्दर्शक, निर्माता मिलिंद दास्तान, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री देविका दप्तरदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर पारितोषिक वितरण वेळी राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ तसेच वरिष्ठ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राष्ट्रवादी चित्रपट आघाडीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाबासाहेब पाटील, सिने अभिनेते सुनील गोडबोले, अरुण नलावडे, असित रेडीज, सिद्धेश झाडबुके, हास्य कलाकार प्रभाकर मोरे हे उपस्थित होते "एकटाच" या लघुपटाचे दिग्दर्शन डॉ. खुशालसिंग राजपूत यांनी केले असून निर्माता विजय माळवे, संगीत नेवे, गीतकार व गायक ह. भ. प. रामकृष्ण महाराज, कथा लेखक व कलाकार राकेश चौधरी, आकांक्षा जगदाळे, शुभांगी देवकर, विजय माळवे, योगेश होळकर, पंकज ठाकरे, दीपक साळी, पवन मराठे इ. आहेत. तसेच आमच्यात नाहीत ते नेहेमी आमच्या आठवणीत राहणारे कॅमेरामन (D.O.P.) स्व. विशाल चौधरी होते. या लघुपटात स्त्री भ्रूण हत्या का होते याच्यावर प्रकर्षाने प्रकाश टाकण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास नंदुरबार येथून दिग्दर्शक डॉ. खुशालसिंग राजपूत, निर्माता विजय माळवे, भा. ज. पा. मा. जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, मुकेश राजपूत, जितेंद्र खवळे आणि धुळे येथून भटू चौधरी उपस्थित होते.