*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा*
*पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल चौधरी हे होते. प्रमुख वक्ते म्हणून हिंदी विषयाचे शिक्षक विश्वास गायकवाड होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कवितावाचन, भाषण व निबंध स्पर्धांमधून हिंदी भाषेप्रति आपला प्रेमभाव व्यक्त केला. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चेतना चौधरी यांनी हिंदी विषयाचे महत्त्व कवितेतून विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी हिंदी भाषेचे राष्ट्रीय एकात्मता व संवाद साधन म्हणून असलेले महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चौधरी यांनी केले. आभार नितीन साळे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक सुरेंद्र पाटील, सुधाकर सूर्यवंशी, उज्वला चौरे, अमोल भदाणे, शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, सुधाकर ठाकूर आदी उपस्थित होते.