*एस. ए. मिशन येथे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस. ए. मिशन येथे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न*
*एस. ए. मिशन येथे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-प्रारंभी मिशन ट्रस्टच्या म्हार्था सुतार यांनी मुली महिलानां आपल्या अविरत सेवेतील संस्कार शिस्त शिवाय त्या मानव घडूच शकत नाही. यावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमात लाभलेल्या प्राचार्य नूतवर्षा यांनी देखील आपले मनोगतात सांगितले कि हल्लीच्या काळात मुली महिलांनी सक्षमीकरण व शैक्षणिक पात्रता वाढवन्या बरोबर व्यवसाय शिक्षणावर देखील भर द्यावा व आपले करिअर सक्षम करावे असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यां तथा मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांनी देखील महिला मुली यांनी आपल्या संरक्षण व स्वावलंबन या विषयी सतर्क रहावे व आपले उदरनिर्वाहासाठी आपल्यातील स्किल विकसित करावे असे मार्गदर्शन केले. या बरोबर व्यवस्थापिका जिलीआना गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहयोगिता संस्था यांनी मुलींना सौन्दर्य शास्त्र प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रसंगी या डिजिटल दुनियेत सुंदरता व कॉस्मेटिक दुनियाचा व्यवसाय हा फार मोठे अर्थाजनचे साधन झाले असून या विषयी अडव्हान्स पार्लर प्रशिक्षण देण्यात आले ट्रेनर मास्टर सोनल वाघ व ट्रेनर मास्टर आशा रायसिंग यांनी प्रशिक्षण दिले प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्याने त्यांना वरील मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या वेळेस उपस्थिती मान्यवरांनी करिअर मार्गदर्शन देखील केले व प्रशिक्षणार्थी णी आपल्या मनोगतातून आपले विचार मांडले.