*अनुकंपा नोकरीसाठी अन्यायग्रस्त मातेचे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण, कोलंबीच्या संस्था व प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुकंपा नोकरीसाठी अन्यायग्रस्त मातेचे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण, कोलंबीच्या संस्था व प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश*
*अनुकंपा नोकरीसाठी अन्यायग्रस्त मातेचे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण, कोलंबीच्या संस्था व प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश*
नांदेड(प्रतिनिधी):–नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील शंकरराव चव्हाण विद्यालयातील कार्यरत शिक्षक शंकर पुंडलिक सिरसे यांच्या निधनानंतर, अनुकंपा तत्वावर मुलास नोकरी देण्याऐवजी संस्थेने खोटे आश्वासन देऊन इतरांची भरती केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही या अन्यायाला पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप करत, अन्यायग्रस्त पत्नी वंदना शंकरराव सिरसे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. वंदना सिरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पतीचे दिनांक 3 एप्रिल 2013 रोजी निधन झाल्यानंतर शासन नियमांनुसार वारस हक्कावर मुलास नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने मागील 12 वर्षांपासून प्रकरणाची दखल न घेता सतत टोलवा टोलवी केली. 26 ऑगस्ट 2025 रोजी सादर केलेले निवेदन देखील धूळ खात पडले असून, त्यामुळे उदरनिर्वाहाच्या संकटात सापडलेल्या या महिलेला अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. शासनाने तातडीने नियुक्ती आदेश काढून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंदना सिरसे यांनी दिला आहे. त्यांच्या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या असूनही आजवर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.