*वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा येथील विद्यार्थांचे पावसाळी बाल क्रीडा महोत्सवात घवघवीत यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा येथील विद्यार्थांचे पावसाळी बाल क्रीडा महोत्सवात घवघवीत यश*
*वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा येथील विद्यार्थांचे पावसाळी बाल क्रीडा महोत्सवात घवघवीत यश*
नवापूर(प्रतिनिधी):-खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, बालपणापासूनच त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी व त्यांचे क्रीडा नैपुण्य वाढवण्यासाठी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ तर्फे नंदुरबार येथे दोन दिवसीय पावसाळी बालक्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण संस्थेतून बारा वर्षे वयोगटातील (बालगट) मुले कबड्डीचे 16 संघ, मुली कबड्डी 16 संघ, मुले खोखो 16 संघ, मुली खो-खो 16 संघ सहभागी झाले होते. या संस्थेअंतर्गत झालेल्या पावसाळी बाल क्रीडा महोत्सवात संस्थेच्या वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा येथील मुलांच्या कबड्डीच्या संघाने रंगत लढतीत द्वितीय क्रमांक पटकावला तसेच मुलींचा खो-खो संघ चुरशीच्या लढतीत प्रथम विजेता ठरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून खेळामुळे संघभावना आणि व्यक्तिमत्व विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, नाशिक मा. श्री.दिनकर पावरा साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, प्राचार्या श्रीम. नटावदकर व संचालक, नवापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्तार अधिकारी रमेश देसले, रायते, विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख राकेश देसले, मुख्याध्यापक लक्ष्मण गावीत, क्रीडा शिक्षक अशोक पाडवी, राजन गायकवाड, कांतीलाल वसावे, राजु गावीत, दिलीप गावीत, प्राचार्य प्रमोद चिंचोले, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी, श्रीम. प्रतिमा पाडवी, श्रीम. दक्षायणी वसावे, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.