*नंदुरबार जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडा मार्फत रक्तदान शिबिरासह वारली पेंटिंग व चला रूढी परंपरा जपूया या विषयावर विविध कार्यक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडा मार्फत रक्तदान शिबिरासह वारली पेंटिंग व चला रूढी परंपरा जपूया या विषयावर विविध कार्यक्रम*
*नंदुरबार जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडा मार्फत रक्तदान शिबिरासह वारली पेंटिंग व चला रूढी परंपरा जपूया या विषयावर विविध कार्यक्रम*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडा मार्फत रक्तदान शिबिरासह वारली पेंटिंग व चला रूढी परंपरा जपूया या विषयावर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (माडा) नंदुरबार यांचे तर्फे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. माडा दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले माडा सदस्यांनी त्यात रक्तदान केले एकूण 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी वारली पेंटिंगचे वर्कशॉप घेण्यात आले त्यात 78 लहान मोठ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. चला रुढी परंपरा जपूया हा नवीन उपक्रम राबविला त्यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या चालीरीती बाबत डॉ. नरेश पाडवी, संविधानातील आदिवासींचे अधिकार व संस्कृतीचे महत्त्व बाबत डॉ.मनोज गावित व बोली भाषेचे महत्व याबाबत डॉ. विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, उपाध्यक्ष डॉ. संजय गावित डॉ. मनीलाल शेट्टी, सचिव डॉ. सुनील वळवी, सहसचिव डॉ.योगेंद्र पाडवी, कार्याध्यक्ष डॉ. अजित कोठारी, डॉ. योगेश वळवी, कोषाध्यक्ष डॉ. संजीव वळवी, तालुका प्रतिनिधी
डॉ. कृपाल वळवी, डॉ. दिलीप पाडवी, सदस्य डॉ. जयदीप वळवी, डॉ. मनोज वळवी, डॉ. मनीषा वळवी, डॉ. उज्वला वसावे, डॉ. प्रतिभा वळवी, शर्मिला वळवी, पुनम वळवी, कविता गावीत, गायत्री पाडवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.