*नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा व वाहतूक विषयक विशेष मार्गदर्शन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा व वाहतूक विषयक विशेष मार्गदर्शन*
*नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा व वाहतूक विषयक विशेष मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये महिला सुरक्षेची जाणीव वाढावी तसेच वाहतूक नियमांचे योग्य पालन व्हावे, यासाठी शहरातील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे विशेष जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहर पोलीस ठाणे येथे नियुक्त महिला पोलीस उप निरीक्षक विजया वसावे यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षेबाबत कायदे, स्वसंरक्षणाचे उपाय, तसेच वाहतूक नियमांचे महत्व, हेल्मेट/सीटबेल्ट वापरणे, अपघातांची कारणे याबाबत सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या तसेच स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
शाळांमधील शिक्षक -शिक्षिकांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांमध्येही सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमामुळे लहान वयातच कायद्याचे महत्त्व, सुरक्षित व जबाबदार नागरिक बनण्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त .एस यांनी व्यक्त केला आहे.