*शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी*
*शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात बहुतांश शाळा या विशिष्ट दुकानातूनच गणवेशासह शालेय वस्तू खरेदी करण्याची सक्ती करून पालकांची लूट करत असतात. आता दर शनिवारी क्रीडा गणवेशचा नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना विशिष्ट दुकानावरून गणवेश घेण्याची सक्ती केली जात आहे व त्यातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यातून होणारी पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना हिंदु सेवा सहाय्य समितीकडून देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, दर शनिवारी आनंददायी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशचा (स्पोर्ट्स ड्रेसचा) नावाने विशिष्ट दुकानातून ड्रेस खरेदी करण्यास तोंडी सांगतात. हा शालेय क्रीडा गणवेश (स्पोर्ट्स ड्रेस) 600 ते 700 रुपये पर्यंत मिळतो. वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता हा फक्त 300 ते 350 रुपये किमतीचा असेल परंतु शाळेचा सिम्बॉल लावून त्याची दुपट किमतीने विक्री केली जाते. या सर्व प्रकारामध्ये शाळेचे संस्था चालक, शाळेचे कर्मचारी यांचीही मिलीभगत असते का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांचे शाळेचा छुप्या शुल्कापोटी तर कधी गणवेश, स्पोर्ट्स ड्रेस, शालेय साहित्य पोटी हजारो रुपयांचे ओझे त्यांच्यावर येत आहे. तसेच शाळेला संगणक शासनाकडून उपलब्ध होत असूनही संगणक शुल्काचा नावे फी पालकांकडून वसूल केली जाते. तरी वरिल तक्रारीची दखल घेऊन शैक्षणिक संस्थांची चौकशी करून पालकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, संदीप राजपूत, उज्वल राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.