*भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ-पुणे विभागाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ-पुणे विभागाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
*भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ-पुणे विभागाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
पुणे(प्रतिनिधी):-दापोली तालुक्यातील मौजे भडवळे ग्रामविकास संस्था व महिला मंडळ पुणे विभागाचा वर्धापन दिन गावदेवीच्या कृपेनें यशस्वी रित्या पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आरोग्य विषयी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, संस्थेचा लोगो प्रकाशन, सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदी- कुंकू समारंभ व स्नेहमेळावा आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद फडकले हे होते. सदर कार्यक्रमासाठी
डॉ. शेखर कुलकर्णी प्रख्यात कर्करोग तज्ञ, अतुल कासवा नाट्य व सिने अभिनेते सौ.सरस्वती शेंडगे मा.उपमाहापौर पुणे म.न.पा. मा. राजा शेंडगे सामाजिक कार्यकर्ते
सौ. प्रियांका शेंडगे शिंदे, सरचिटणीस भाजपा महिला आघाडी पुणे शहर
अध्यक्ष विजय शिंदे, काशिनाथ नाचरे, रामचंद्र खांबे, पांडुरंग खांबे, सचिन रेमजे, कैलास नितोरे, सौ सारिका शिंदे, अध्यक्ष सौ. वैशाली नितोरे, सौ. रिया काताले, सौ. रेश्मा भुवड आदी मान्यवर उपस्थित होते व कार्यक्रमासाठी गावातील बंधू, भगिनी व माहेरवासिनी बहू संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक शिंदे, विशाल नाचरे व तुषार खांबे यांनी केले कार्यक्रम यशस्वी रित्या करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.