*महात्मा फुले हायस्कूलचा डंका शिष्यवृत्ती परीक्षेत 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा फुले हायस्कूलचा डंका शिष्यवृत्ती परीक्षेत 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत*
*महात्मा फुले हायस्कूलचा डंका शिष्यवृत्ती परीक्षेत 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत*
नांदेड(प्रतिनिधी):-इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित शहरातील बाबानगर व विजयनगर येथील महात्मा फुले हायस्कुलचे 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून हे सर्व विदयार्थी महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने मुख्याध्यापिका, सौ. एस.आर कदम यांनी विदयार्थ्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्याद्यापक ए.आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. आर देशमुख, शालेय समिती अध्यक्ष आर.डब्ल्यु वाघमारे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख व्हि.डी. हिवराळे, पी.एन.मोटे, जी.एच राऊत, सौ.जे.बी बनसोडे, आर.बी. लोकरे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी ज्यांच्या शिकवणुकीमुळे विद्यार्थाना यश मिळाले असे शिक्षक बोचकरी, पटवेकर, सौ. भलगे, सौ. कदम, सौ.नेवरकर, सौ साखरे, भंडारकर, जनकवाडे, हेगु , सौ.वाडेवाले, सौ. पेंडलवाड,सौ. टेंभूर्णेवार, सौ. चुंचेकर, डी.ए. नारे, सौ.पांचाळ, सौ. कोथळकर, पवार, राठोड, वाघ, देशमुख यांचा सत्कार तर संतोष सुर्यवंशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला तर पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विदयार्थी, अर्णव बंडे, संजिवनी नरवाडे, समर्थ पानपटकर, मयुर कदम, ओमकार खिल्लारे, मानस गंदेवार, अनुप सावंत, गिरीश मामीडवार, तनुश धोतरे, श्रेया वडवळे, जयेश गुटे, तनुजा जाधव, मैथीली घोडेकर, मानवी अंभोरे, तन्वी रुद्रकंटवार, शैलजा पवार तर आठवीतील विद्यार्थी भूस्सा मिथीलेश, विरेन मुखेडे, जेात्सना बोदेवाड, पल्लवी बेंद्रे, समीक्षा मादरीवाल, अक्षरा पडवळे, रणवीर केद्रे, किरण शेंडगे, मानव खरबे, अनिकेत कल्याणकर, श्रेया जाधव, साईराज बळदे, सोहम इंगळे, स्वराज लुंगारे, उत्कर्षा कदम, यश जाधव, अर्णव क्षीरसागर, जाधव गौरी, लक्ष्मीकांत देशमुख याचाही सन्मान करण्यात आला आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थांचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, उपाध्यक्षा तथा माजी आ.अमिता चव्हाण, सचिव तथा माजी मंत्री डी.पी. सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲङ. उदय निबांळकर, कार्यकारिणी सदस्य तथा भाऊराव चव्हाण कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, सौ.श्वेता पाटील यांनी सर्व यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.