*समाजसेवी संस्थेकडून मोफत बियाणे वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समाजसेवी संस्थेकडून मोफत बियाणे वाटप*
*समाजसेवी संस्थेकडून मोफत बियाणे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या आश्रय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नंदुरबार या समाजसेवी संस्थेच्यावतीने अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 प्रकल्पतील मौजे वडफळी ग्रामपंचायतीतील 6 गावामध्ये मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत जवळपास 240 शेतकऱ्यांना 10 किलो शेवगा बियाणे व 5 किलो बांबू बियाणे तसेच भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. व लोकसहभागातून शेवगाच्या बियांची लागवड करून घेण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश कहार यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात व्हावी व योग्य तंत्रज्ञानाचा लाभ त्यांना मिळावा, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे."
कार्यक्रमाचे उद्घाटन पाणलोट विकास समिती सचिव दिलवरसिंग वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे पाणलोट पथक प्रमुख तथा उप कृषी अधिकारी दिलीप गावीत, सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत वसावे, पाणलोट पथक सदस्य शिवदास पवार, नंदू बैसाणे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम आगामी काळात तालुक्यातील इतर गावामध्ये देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव हरीष मोरे यांनी दिली व सर्वांचे आभार मानले.