*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
*डी आर हायस्कूल येथे राज्य कबड्डी दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस राज्य कबड्डी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक तर प्रमुख अतिथी लायन्स क्लबचे झोन चेअरमन सतीश चौधरी, खजिनदार डॉ. चेतन बच्छाव, सचिव दिनेश वाडेकर, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव अशोक वसईकर, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अतिथी डॉ. चेतन बच्छाव यांनी खेळाडूंचा आहार सकस असावा, जेवणात हिरवे पालेभाज्यांच्या सहभाग असावा, आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवावे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी मोबाईल मुळे विद्यार्थी मैदानी खेळ विसरत चालले आहे, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी खेळ अंगी बाळगावा असे मार्गदर्शन केले. शालेय स्तरावर इ.8 वी व आ.9 वी च्या दोन गटात कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यातअतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यात आपले सर्व कौशल्य पणाला लावून शेवटच्या क्षणी इ.8 वी तु.अ चा संघ विजेता तर इ.8 वी तु. ई चा संघ उपविजेता ठरला तसेच इ.9 वी तु.ड चा संघ विजेता तर इ.9 वी तु. क चा संघ उपविजेता ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावित यांनी केले त प्रास्ताविक जगदीश बच्छाव आभार तुषार नांद्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.