*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
*भूजलसाठा वाढविण्यासाठी रिचार्ज खड्डे तयार करा-संजय मिरजकर*
नायगांव(प्रतिनिधी):-अलीकडच्या काळात पाणी पातळी ही अतिशय खोल गेली आहे त्यामुळे पाणी पातळी भूजलसाठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावात रिचार्ज खड्डे निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावात ठिक-ठिकाणी रिचार्ज खड्डे निर्माण करावेत असे आवाहन नायगांव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय मिरजकर यांनी केले. जल जीवन मिशन अंतर्गत टेक्नोस्पर्ट ग्राम विकास प्रतिष्ठान परभणी यांच्या वतीने तालुका परिसरातील सरपंच, गाव पातळीवरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी दिनांक 14, 15 जुलै रोजी नायगांव येथे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी यांना आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आले याप्रसंगी नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय मिरजकर, विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, समन्वयक इंदूरकर, प्रशिक्षक साईनाथ मंचेवार, अजय भंडारे मनोज मोहरील, राजू गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना मिरजकर म्हणाले की, आपण जे दोन दिवस प्रशिक्षण घेतलात त्याची आप- आपल्या गावात अमलबजावनी करावे, दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वसामान्य कुटूंबियांना ग्रामपंचायतीच्या वतीने रुद्रजलची मात्रा मोफत वाटप करण्यात यावी.
याप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, समन्वयक इंदुरीकर, राजू गुट्टे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सरपंच व्यंकटराव नरवाडे भगवानराव जाधव शंकर डोईफोडे लक्ष्मण कांबळे यांसह आशा वर्कर अंगणवाडी सेविका आधीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.