*ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे. वाय.शिर्के हायस्कूल कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे. वाय.शिर्के हायस्कूल कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा*
*ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे. वाय.शिर्के हायस्कूल कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-शरद पवार कृषी महाविद्यालय खरवते दहीवली येथील कृषीकन्या कु. सानिका साळवी, कु .मानसी म्हात्रे, कु. स्नेहल पाटील, कु वैष्णवी शेळके, कु. हर्षिता मोवळे, कु. प्रणाली दिघे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत जे.वाय. शिर्के हायस्कूल, कुटरे येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला. या कार्यक्रमानिमित्त जे.वाय. शिर्के हायस्कूल ते कुटरे बजारपेठेपर्यंत 'जय जवान जय किसान कृषी विकास देशाचा विकास' अशा घोषणा देत कृषी दिंडी काढण्यात आली. शरद पवार कॉलेजचे प्राध्यापक प्रसाद साळूंखे व प्रणय ढेरे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थी यांना कृषी दिनाचे महत्व पटवून दिले. तसेच ग्रामसेवक पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कृषीदिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून गावचे सरपंच संजीवकुमार गुजर, ग्रामसेवक मंगेश पांचाळ, पोलिसपाटील बळीराम साळूंखे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास झगडे, तसेच सदस्य सुर्यकांत आग्रे, हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. पाटील तसेच सहा. शिक्षक डी.ए. कुंभार, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत कृषी दिनाचा सोहळा पार पडला.