*'एक पेड मॉं के नाम'अभियानांतर्गत देवरे विद्यालयात पालक वर्गाकडून वृक्षारोपण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'एक पेड मॉं के नाम'अभियानांतर्गत देवरे विद्यालयात पालक वर्गाकडून वृक्षारोपण*
*'एक पेड मॉं के नाम'अभियानांतर्गत देवरे विद्यालयात पालक वर्गाकडून वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे भारत सरकारच्या राष्ट्रव्यापी एक पेड मा के नाम या संकल्पनेला मूर्त रूप पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना व पालक वर्गाला मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी अभियानाची ओळख करून दिली व आईच्या नावाने वृक्ष लागवड करून जोपासना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला विखरण, नाशिंदे, खापरखेडा, बोराळा येथील बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत कु.जिया चि.विनीत सौ. सविता व प्रशांत नवल पाटील यांनी व कु.मयुरी, चि. भावेश सौ.रुपाली व रविंद्र कोळी या परिवाराने वृक्षारोपण करून चारही विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प पालक शिक्षकांसमोर केला. विद्यालय परीसरात पालक विद्यार्थी वर्गाकडून वृक्षारोपण करण्यात आले. मिशन लाईफ अंतर्गत विद्यालयातील इको क्लब मेंबर सी.व्ही. नांद्रे, डी.बी.भारती व प्रतिनिधी इ.9 वी, 10 वी चे विद्यार्थी यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.उपक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, एम.एस. मराठे, व्ही.बी.
अहिरे ए.एस.बेडसे, एस.एच.गायकवाड तसेच डी.बी.पाटील, एच.एम.खैरनार, एस. जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.