*शालेय विद्यार्थ्यांसाठी तळोदा ते रापापूर एसटी बस सुरू करण्याची शेठ के डी हायस्कूलची निवेदनाद्वारे मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालेय विद्यार्थ्यांसाठी तळोदा ते रापापूर एसटी बस सुरू करण्याची शेठ के डी हायस्कूलची निवेदनाद्वारे मागणी*
*शालेय विद्यार्थ्यांसाठी तळोदा ते रापापूर एसटी बस सुरू करण्याची शेठ के डी हायस्कूलची निवेदनाद्वारे मागणी*
तळोदा(प्रतिनिधी):-शालेय विद्यार्थ्यांसाठी तळोदा ते रापापूर एस टी बस सुरू करण्याची शेठ के डी हायस्कूल ची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. तळोदा येथील शेठ के डी हायस्कूल मध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी ये जा करत असतात त्यात रापापुर येथील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आजपर्यंत त्या ठिकाणी बस त्या गावापर्यंत पोहोचलेली नाही व विद्यार्थ्यांना खाजगी रिक्षाने किंवा पायपीट करत प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव प्राण्यांची संख्या वाढल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत अनुपस्थिती मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शेठ के डी हायस्कूल शाळेकडून शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने शाळेमार्फत याबाबत तळोदा बस आगार येथे निवेदन देण्यात आले. तसेच तळोदा ते अमोनी बस सुरू असून ती रापापुर पर्यंत करण्यात यावी व विद्यार्थ्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर शाळेचे उपमुख्याध्यापक जे एन माळी, पर्यवेक्षक पी पी पाटील, पी एम वानखेडे, ए पी सोनार, एन डी मोरे, एस एस ठाकरे, टी एस सूर्यवंशी, आर आय चव्हाण, सी के इंगळे, श्रीमती जे आय राणे, एस बी वसावे, एस के माळी, एन जे वळवी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.