*राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खा.सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचं व किट वाटपाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खा.सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचं व किट वाटपाचे आयोजन*
*राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खा.सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचं व किट वाटपाचे आयोजन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं व किट वाटपाचे आयोजन
करण्यात आलं होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना व्हॉलीबॉल किटचे वाटपही करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या निर्देशानुसार आयोजित या स्पर्धेत अक्कलकुवा तालुक्यातील एकूण 6 व्हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला. यामध्ये एकलव्य पोरांबी, एकता क्लब नवागाव, एडी ब्रदर्स अक्कलकुवा, जामिया अक्कलकुवा, रेडी बेस्ट अक्कलकुवा आणि राजा इलेव्हन अक्कलकुवा या संघांचा समावेश होता. सर्व सहभागी संघांना व्हॉलीबॉल किट देण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यात जिल्हा सचिव गजानन वसावे, जिल्हा उपाध्यक्ष अलीम मकरानी, तालुका अध्यक्ष जितेंद्र वळवी, जिल्हा महिला आघाडीच्या संगीता पाडवी, ज्येष्ठ कार्यकर्ते सलाउद्दीन हाश्मी आणि शरफोद्दीन मकरानी, तालुका उपाध्यक्ष नाजीर बलोच, शहर अध्यक्ष कलीम मकरानी, तालुका उपाध्यक्ष वनसिंग पाडवी आणि राजकुमार वसावे, युवक तालुका अध्यक्ष सागर वळवी, युवक तालुका उपाध्यक्ष रेहज्या वसावे, इरफान पठाण, सलीम मकरानी, जिल्हा महिला उपाध्यक्ष सिंधू वसावे, तालुका चिटणीस चंद्रसिंग वसावे, रिजवान मकरानी, जावेद खाटीक आणि ओबीसी सेल अध्यक्ष राहुल बोरदे यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका उपाध्यक्ष नाजीर बलोच आणि शहर अध्यक्ष कलीम मकरानी यांनी विशेष मेहनत घेतली.