*साईराज गृप सामाजिक संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साईराज गृप सामाजिक संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*
*साईराज गृप सामाजिक संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*
सुरगाणा(प्रतिनिधी):-पिंपळसोंड जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साईराज ग्रुप नाशिक ह्यांच्यातर्फे पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागातील पिंपळसोंड, उंबरपाडा पी, खुंटविहिर, चिंचमाळ, बर्डाची या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य - दप्तर, स्वेटर, वह्या, स्टेशनरी साहित्य, खेळाचे साहित्य, छत्री आणि गोड मिठाईचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हतबल ठरतात. त्या अनुषंगाने सामाजिक संस्था साईराज ग्रुप तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साईराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टोपले, रविंद्र गायकवाड,राकेश ठाकरे, रोशन चिंचले, संदीप पवार, सुनिल गवळी, प्रकाश मोंढे, गणेश नाठे, दुर्वादास गायकवाड,रतन चौधरी आदी उपस्थित होतें. मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शालेय गरजेपयोगी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र भोये, उपशिक्षक प्रविण पवार, शाळा. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल, उषा खोटरे, ओमिका गावित व सहभागी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.