*डी आर हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी आर हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा*
*डी आर हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे 11 जुलै जागतिक लोकसंख्या दीन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेची उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, प्रमुख वक्ते दिनेश वाडेकर, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, उत्सव समिती प्रमुख राजश्री गायकवाड व राजेंद्र लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरेला पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थी मनोगतातून हर्षवर्धन शिंदे, गणेश जरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिनेश वाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की लोकसंख्या आजच्या घडीला देशाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे.
अध्यक्षीय मनोगतात शाळेचे उपमुख्यध्यापक श्रीराम मोडक यांनी वाढती लोकसंख्या व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भदाणे यांनी केले तर प्रास्ताविक कविता भांडारी, आभार राजश्री गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी प्रशिक्षकांच्या कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.