*काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश खा.अशोक चव्हाण यांनी केले स्वागत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश खा.अशोक चव्हाण यांनी केले स्वागत*
*काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश खा.अशोक चव्हाण यांनी केले स्वागत*
नांदेड(प्रतिनिधी):-माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक नामांकित डॉक्टर, तसेच काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खा. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. या सोहळ्यास महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपचे नेते डॉ. अंकुश देवसरकर, लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, तसेच डॉ. अमर काळबांडे (सेनगाव), डॉ. गोविंद वानखेडे (हिमायतनगर), डॉ. राहुल वानखेडे, डॉ. चंद्रकांत थोटे (कुरळा-कंधार), डॉ. बागल, डॉ. प्रताप प्रभणकर, डॉ. सुनिल जाधव, डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. आशिष बेरळकर, डॉ. राजू धामने, डॉ. सुरेंद्र सूर्यवंशी, डॉ. दत्ता नरवाडे, डॉ. मिराशे, डॉ. राजेश मुंडकर, डॉ. प्रबुद्ध बिर्हाडे, डॉ. अंकुश गोवंदे, डॉ. दीपक जिवणे, डॉ. नागरे, डॉ. नाकाडे, डॉ. माधव पाटील, डॉ. राजू कदम, डॉ. सुरेश किनीकर, प्रशांत तिडके, बाळू जाधव, धम्मपाल धुताडे, ज्ञानेश्वर लोकमनवार, विजय तोटावाड, वेबव जोशी, संजू पाटील, बालाजी बच्चेवार (नायगाव), बालाजी पवार (अमराबाद), मारोती संवडकर, तानाजी कांबळे, गंगाधर शिंदे, डॉ. थाडके, डॉ. अजय मोळके आणि डॉ. लक्ष्मीनारायण गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अंकुश देवसरकर यांच्या पुढाकाराने डॉ. निलेश जयराम बास्टेवाड (नांदेड), डॉ. प्रशांत मेरगेवाड, डॉ. सोपान जाधव, डॉ. अरविंद जाधव, डॉ. इरबा तोटावाड, डॉ. किरण खैराटकर, डॉ. संजय मोळके (निमगाव-अर्धापूर), डॉ. धनंजय देवमाने (कोळी-हदगाव), जेम्स तुमलपल्ली, निलेश पल्लेवाड, विशाल राऊतखेडकर, संदीप जाधव, सचिन डाखोरे, रोहन चौधरी, शुभम मरेवार, अमोल मोहरे, दर्शन तोरणे, आकाश रुनवाल, ओमकार बंडलवाड, शुभम सांगळे, साईराज राजगोरे आणि ऋषी महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मारवाडी युवा मंचचे सुमित मुथा यांच्या पुढाकाराने मंचाचे अध्यक्ष सुमित सारडा, माजी अध्यक्ष चेताजी पंडित, राधेगोविंद शर्मा, सदस्य द्वारका पुरोहित, सचिन मालपानी, विनोद सातव, गजानन सोनटक्के, गणेश सूर्यवंशी, धीरज साबू यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते प्रणव जगदीश उमरीकर, शंतनू गट्टू, निशांत पोन्नम, शिवम इबितदार, मधुकर राजूरकर, अजय पवार, जय झगडे, अवि कंधारे, हर्ष बरांडे, गणेश चव्हाण, दीपक काठीले, दीपक डोईजड, शैलेश पोन्नम आणि आकाश मुंगल यांनी पक्षात प्रवेश केला. तसेच, लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष दत्ता शेटे, सतीश आनेराव, माजी नगरसेवक अनिल दाढेले आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष बनसोडे व धोंडीबा जाधव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपची सत्ता असून, विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी दमदार वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन देखील खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.