*500 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात,खा.अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*500 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात,खा.अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा*
*500 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात,खा.अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेड शहरातील 500 खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी खा. अशोक चव्हाण सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या संपर्कात आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्वी 100 खाटांचे होते. खा. अशोक चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 300 खाटांचे नवे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला होता व नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी 231.25 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात 138.21 कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, 2 ऑक्टोबर 2023 रोजी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात घडलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमिवर खा. अशोक चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 300 खाटांच्या प्रस्तावित रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्यास 500 खाटांचे करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना 500 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते.
त्यानुसार नव्या रुग्णालयासाठी 372 कोटी रुपयांचा पुनःसुधारित प्रस्ताव राज्य सरकारडे सादर करण्यात आला. 500 खाटांच्या रुग्णालयाच्या मान्यतेचा शासन निर्णयही जारी झाला असून, आता प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. याबाबत खा. अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुनःसुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता तसेच नवीन रुग्णालयाचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण करून दरम्यानच्या आवश्यक ती पदनिर्मिती करुन पदभरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री अतुल सावे यांच्याशीही खा. चव्हाण यांची चर्चा झाली होती. त्याअनुषंगाने 500 खाटांच्या रुग्णालयाच्या मंजुरी प्रक्रियेला लवकरच गती मिळणे अपेक्षित आहे.