*के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय नागसर येथे "गुरुपौर्णिमेचा" कार्यक्रम संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय नागसर येथे "गुरुपौर्णिमेचा" कार्यक्रम संपन्न*
*के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय नागसर येथे "गुरुपौर्णिमेचा" कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय नागसर येथे "गुरुपौर्णिमेचा" कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी ही होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सरपंच अशोक गावीत हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंना गुलाब पुष्प देऊन अभिवादन केले.
प्रमुख वक्ते सुनील घुगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धती विषयी माहिती सांगितली, त्यांनी गुरु म्हणजे ज्ञानाच्या दीप व शिष्याच्या जीवनातील मार्गदर्शक असून गुरुचे शिष्याच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून गुरु शिष्य परंपरेच्या गौरव करत गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध भामरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.