*ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ,नालासोपारा मोरेगाव (रजि.)तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ,नालासोपारा मोरेगाव (रजि.)तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न*
*ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ,नालासोपारा मोरेगाव (रजि.)तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ, नालासोपारा मोरेगाव (रजि.) तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवारी (6जून) रोजी अत्यंत भक्तिभावाने, हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपन्न झाला. सकाळी 8.40 विरार लोकलमध्ये पूजन करून हरिनामाचा गजरात दिंडीला शुभारंभ करण्यात आला. दिंडीने भक्तिरसात चिंब होऊन चर्चगेट स्टेशन गाठले. संत सेवा समितीचे कार्यकारी पदाधिकारी यांनी प्रेमपूर्वक स्वागत केले. तिथे जणू काही प्रतीक पंढरपूरच उतरले होते, असा आनंदमय सोहळा सर्व भाविकांनी अनुभवला. दुपारी 12 वा.दहिसर येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. यावेळी मंदिर समितीनेही भव्य स्वागत केले. रिंगणात भक्तिमय गजर, टाळ- मृदुंगाचा गगनभेदी निनाद, भजनांचे सुमधुर सूर आणि भक्तांची एकरूपता या साऱ्या वातावरणात दिंडी न्हालेली होती. शेवटी शिवमंदिर, मोरेगाव येथे भजन गजरात दिंडीची भव्य सांगता कार्यक्रम पार पडला. या पवित्र सोहळ्यात कार्याध्यक्ष सुनील कदम, अध्यक्ष गणेश पवार, सेक्रेटरी शैलेश मोडक, खजिनदार अंकुश सावंत, दिंडी प्रमुख शरद जाधव, तुकाराम सावंत, दिपक सावंत, शंकर नेवगे, मलेश जाधव, निलेश खरपुडे, दिपक पाटील, जनार्दन, अजय, नवनाथ बाईंग, आनंदा मत्रे आदीं पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक उपस्थित होते. या सर्वांनी आप-आपली जबाबदारी उत्तमरित्या बजावली. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती मंडळाचे आधारस्तंभ धनाजी जाधव, मोरेश्वर विद्यालय संस्थापक पंढरीनाथ पाटील, अॅड. वैभव पाटील, आशिष दळवी (ट्रेन मॅनेजर चर्चगेट) यांची लाभली. सेक्रेटरी शिवजयंती उत्सव मंडळ आणि आषाढी एकादशी उत्सव मंडळ, तसेच सर्व सभासद आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन हा भक्तिमय सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेमाने पार पाडला. खरंतर ही दिंडी नव्हे तर भक्तीचा महापूर होता अशी प्रचिती आली.