*लाखापुर फॉरेस्ट येथे गुरु पौर्णिमा संपन्न–गुरूच्या आठवणींचे स्मरण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर फॉरेस्ट येथे गुरु पौर्णिमा संपन्न–गुरूच्या आठवणींचे स्मरण*
*लाखापुर फॉरेस्ट येथे गुरु पौर्णिमा संपन्न–गुरूच्या आठवणींचे स्मरण*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय हरी पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्वाचे स्थान सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी फिरोजली सय्यद यांनी गुरूंच्या कार्याचे आणि महत्त्वाचे वर्णन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा कोळी यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत भारतीय संस्कृतीतील गुरूंच्या स्थानावर प्रकाश टाकला. गुरुपौर्णिमा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील उपशिक्षक संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चांदो पाडवी,
फिरोजअली सय्यद, श्रीमती सुवर्णा कोळी, अनिल भामरे, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.