*एकलव्य विद्यालयाचे राज्यस्तरीय गणित स्पर्धेत यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयाचे राज्यस्तरीय गणित स्पर्धेत यश*
*एकलव्य विद्यालयाचे राज्यस्तरीय गणित स्पर्धेत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-गणित अध्यापक महामंडळ तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
या परीक्षेत शहरातून फक्त तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी दोन विद्यार्थी विद्यालयाचे आहेत. श्रवण सुनील धुळे आणि हिमांशू गणेश सूर्यवंशी या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना एक भेटवस्तू देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, संस्थेचे गणित विभाग प्रमुख धर्मेंद्र मराठे, विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख कल्पेश तांबोळी, मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, टिका पाडवी, संतोष पाटील, सुयोग शिंपी, संदीप पाटील, विश्वास जठार, सुदर्शन चोळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खैरनार यांनी केले.