*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे गुरुपौर्णिमा साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे गुरुपौर्णिमा साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे गुरुपौर्णिमा साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून भील होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी इ.5 वी ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमेचे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचीन काळापासून गुरू शिष्य
परंपरेबद्दल आपल्याला माहीत आहे. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आपण गुरू पौर्णिमा म्हणुन साजरा करतो. असे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रमुख वक्ते भील यांनी गुरुपौर्णिमा बद्दल माहिती देत असताना गुरु द्रोणाचार्य वर एकलव्य यांच्या दाखला देत गुरु शिष्याचे नातं किती अतूट असतं याबद्दल सांगितले. तर आपले अध्यक्ष भाषणामध्ये उमेश पाटील यांनी सांगितले की गुरु हे सर्व परी असतात गुरुचे आज्ञाचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे तरच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकतात. त्याचबरोबर महर्षी व्यास यांनी महान असे महाभारत काव्य लिहून एक आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळुंखे यांनी केले तर आभार खेडकर यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी मगरे, ढोडरे, मोरे, पाडवी, जांभोरे, भाऊसाहेब राठोड आणि मोहन वळवी तसेच सुबोध जावरे यांनी परीश्रम घेतले.