*जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न*
*जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथील भूगोल विभागातर्फे 11 जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या वाढ – आव्हाने आणि उपाय” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. एस. के. चौधरी यांनी उपस्थिती दर्शवली. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. चंद्रकांत देसले यांनी जागतिक लोकसंख्या 8.1 अब्जांवर पोहोचल्याचा संदर्भ देत भारतातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण, त्याचे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय परिणाम यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. घटणारे भूक्षेत्र, झोपडपट्ट्यांचे विस्तार, टंचाईग्रस्त शहरे आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे पर्यावरणीय बदल यांची सखोल मांडणी करत, लोकसंख्या ही योग्य नियोजनाच्या आधारावर देशाचे भांडवल ठरू शकते, हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडला. शिक्षण, महिला सक्षमीकरण व कुटुंब नियोजन हे शाश्वत विकासाचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता बारावीच्या विना कासार या विद्यार्थिनीने उत्कृष्टरीत्या पार पाडले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.