*नांदेड ते घुमान व्हाया शिमला–महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी 'घुमान यात्रा'*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नांदेड ते घुमान व्हाया शिमला–महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी 'घुमान यात्रा'*
*नांदेड ते घुमान व्हाया शिमला–महाराष्ट्र व पंजाबमधील सांस्कृतिक ऋणानुबंध जपणारी 'घुमान यात्रा'*
नांदेड(प्रतिनिधी):–महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा 11 व्या वर्षात पदार्पण करत आहे. नानक साई फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही यात्रा 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भव्यतेने संपन्न होणार आहे. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार, महाराष्ट्र- पंजाबमधील बंधुत्व वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन करणे यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संत नामदेव महाराजांची कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे तसेच पंजाब- हिमाचल प्रदेश -दिल्ली -हरियाणा राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. दिल्ली, शिमला, चंदिगड, अमृतसर, भटिंडा, वाघा बॉर्डर, कुरुक्षेत्र, नैना देवी शक्तीपीठ, कार्तिक स्वामी, आनंदपुर साहिब, फत्तेगड साहिब, भाक्रा नांगल धरण, भद्रकाली माता मंदिर, पानिपत, जालियनवाला बाग, बस्सी पठाना, लव-कुश जन्मभूमी आणि श्री क्षेत्र घुमान या स्थळांचा यावर्षीच्या यात्रेत समावेश राहणार आहे. राष्ट्रभक्तीचा अनुभव, परिवारासह प्रवासासाठी योग्य, आध्यात्मिक व पर्यटनाचा संगम, पंजाबी मेहमाननवाजी व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी कौटुंबिक सहलीत सहभागी होण्यासाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे. भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी या वर्षीची ‘घुमान यात्रा’ नक्कीच आनंदवारी ठरणार आहे.