*शिवणे बुद्रुक येथील रस्ता खचल्याने वाहतूकीस धोका, ग्रामस्थांमध्ये घबराट*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवणे बुद्रुक येथील रस्ता खचल्याने वाहतूकीस धोका, ग्रामस्थांमध्ये घबराट*
*शिवणे बुद्रुक येथील रस्ता खचल्याने वाहतूकीस धोका, ग्रामस्थांमध्ये घबराट*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील शिवणे बुद्रुक येथील रस्ता सोळा वर्षांपूर्वी खचलेल्या त्याच ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती झाल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे सन 2009 मध्ये याच ठिकाणी रस्ता खचल्याची घटना घडली होती. दरम्यान या ठिकाणी 'रस्ता खचत चालला आहे, वाहने सावकाश चालवा' असा निनावी खात्याचा फलक लावण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात तुफानी वृष्टी सुरू आहे. यंदा सर्वत्र 14 मे पासून तडाखेबाज अवकाळी पाऊस अवतरल्याने व त्यानंतर मोसमी पावसाने उग्र रूप धारण केल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक भागात नवे व जूने जीर्ण रस्ते वाहून गेले आहेत. अशातच शिवणे बुद्रुक या मुख्य रस्त्याच्या खचण्याची माहिती हाती येत आहे या मार्गावर रस्ता खचत असला तरी एसटी महामंडळाची एसटी बससेवा अद्याप सुरू आहे याच रस्त्यावर पऱ्यालगतची भिंतही कोसळली आहे सदरच्या खचत चाललेल्या धोकादायक रस्त्यामुळे शिवणे गुरव वाडी तसेच वडदहसोळ हळदीची खंद वाडीतील ग्रामस्थांच्या जिवितास धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी लगतच्या गावातून होत आहे.