*धुळे जिल्ह्यात फिरते कायदेविषयक शिबिर व मोबाईल लोक अदालत वाहनाचा शुभारंभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे जिल्ह्यात फिरते कायदेविषयक शिबिर व मोबाईल लोक अदालत वाहनाचा शुभारंभ*
*धुळे जिल्ह्यात फिरते कायदेविषयक शिबिर व मोबाईल लोक अदालत वाहनाचा शुभारंभ*
धुळे(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कायदेविषयक शिबिर व फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा न्यायालय, धुळे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश ए. बी. शर्मा, एस.एम. तपकिरे, वाय.जी. देशमुख, डी.एम. अहेर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रविण कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी के.बी. चौगुले, दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.मडके, न्यायाधीश ए.एस. नलगे, व्ही.जे. चव्हाण, न्यायाधीश एस.व्ही. मडके, न्यायाधीश एस.एस. सय्यद, सदस्य सचिव डी.एल.एस. ए. पी.एन.कुलकर्णी, न्या.एस.एम.कादरी, न्या.एस.आर.पाटील, न्या.एम.ए.चौधरी, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. डी. एस.महाजन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲड.मधुकर भिसे, जिल्हा न्यायालय प्रबंधक सलीम शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्र.अधिक्षक एम.बी. भट, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद म्हणाल्या की, 8 ते 21 जुलै, 2025 या कालावधीत जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये ‘न्याय आपल्या दारी' या संकल्पने अंतर्गत फिरते लोक अदालत शिबिर आयोजित केले आहे. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून पीडीत, गोरगरीब, वंचिताना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक गावातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना लोक अदालत व विविध कायद्याची माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी फिरते लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन न्या. माधुरी आनंद यांनी केले. याठिकाणी होणार फिरते कायदेविषयक साक्षरता शिबिर धुळे तालुक्यात आज 8 जुलै रोजी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय परीसरात, तर 9 जुलै, 2025 रोजी धुळे तालुक्यातील फागणे येथे, शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे 11 जुलै, 2025, शिंदखेडा तालुक्यातील पाठण येथे 15 जुलै, 2025 रोजी, दोंडाईचा येथे व चुंडाणे ता. शिंदखेडा येथे 17 जुलै, 2025 तसेच साक्री तालुक्यातील शेवाळी येथे 21 जुलै, 2025 रोजी फिरते कायदेशीर साक्षरता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईल लोक अदालत शिबिरे, धुळे तालुक्यात कुसूंबा येथे 10 जुलै, 2025 रोजी कायदेविषयक शिबीर व फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे 14 जुलै, 2025 रोजी, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे 16 जुलै, 2025 रोजी. दोंडाईचा येथील टाकरखेडा, ता. शिंदखेडा येथे 18 जुलै, 2025 रोजी तसेच साक्री तालुक्यात जैताणे येथे 19 जुलै, 2025 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे. वरील सर्व ठिकाणी सकाळी 8.30 ते 10.30 वाजेदरम्यान मोबाईल लोकअदालत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.