*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व. विमलताई रघुवंशी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व. विमलताई रघुवंशी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व. विमलताई रघुवंशी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व विमलताई रघुवंशी यांच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत जी टी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या समाधी स्थळी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी मान्यवरांनी स्व विमलताई रघुवंशी यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याला स्मरण करून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मा. मनोज रघुवंशी, संस्थेचे संचालक राम रघुवंशी, माजी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन सौ. कविता रघुवंशी, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, सौ. मेघा रघुवंशी, सौ कल्याणी रघुवंशी जी. टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौउमवि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन डी चौधरी, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, कार्यालयीन अधीक्षक सुदेश रघुवंशी उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ मुकेश रघुवंशी तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.