*स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन*
*स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमांतर्गत गाव पातळीवर स्वच्छतेविषयक झालेल्या कामांबाबत नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करून यात आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे. ग्रामीण भागातील स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 सुरू करण्यात आले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत निवडक 29 गावांची केंद्र शासनाच्या समितीमार्फत तपासणी करण्यात आली असुन यात ग्रामपंचायतीमार्फात ग्राम स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची तपासणी करण्यात येऊन गुणांकन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फात ग्रामस्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधाबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी प्ले स्टोरवरून SBMSSG 2025 हे अॅप डाऊनलोड करावे. अॅपचा वापर करताना सर्वप्रथम मोवाईल क्रमांक नोंदवावा. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून, भाषेची निवड करण्यात यावी. अॅपमध्ये राज्य, जिल्हा, लिंग व वय यासह इतर माहिती भरल्यानंतर एकूण 13 प्रश्न हे गावातील शौचालय सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या स्वच्छता विषयक मुद्यांशी संबंधित विचारली जातील. नागरिकांनी दिलेले सकारात्मक अभिप्राय गावाच्या स्वच्छतेच्या दर्जावर थेट परिणाम करणारे आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध समिती सदस्य, उद्योजक, महिला बचत गट, युवक-युवती, महिला मंडळे व स्वयंसेवी संस्था यांनी हे अॅप डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, व जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख यांनी योग्य नियोजन करून अधिकाधिक नागरिकांचे अभिप्राय अॅपव्दारे संकलित करावेत. स्वच्छ सर्वेक्षण 2025 या देशव्यापी उपक्रमात नंदुरबार जिल्हा अग्रणी ठरावा यासाठी सर्वांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी केले आहे.