*बोलावा विठ्ठल कार्यक्रमाने विठ्ठल भक्त सुखावले*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बोलावा विठ्ठल कार्यक्रमाने विठ्ठल भक्त सुखावले*
*बोलावा विठ्ठल कार्यक्रमाने विठ्ठल भक्त सुखावले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला स्व. अनुराधा दाऊतखाने यांच्या स्मरणार्थ दाऊतखाने व परिवाराच्या वतीने बोलावा विठ्ठल या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन अटलबिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम गायक पार्थ घासकडबी व गायिका मृण्मयी भावसार यांनी सादर केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भागवताचार्य ह भ प अविनाश महाराज उपस्थित होते. अविनाश महाराज यांनी नामस्मरणानेच मनाची शांतता मिळते व मनुष्यजन्माचे सार्थक होते म्हणून नामस्मरण करावे असे आवाहन केले. यानंतर पार्थ घासकडबी व मृण्मयी भावसार यांनी एकाहून एक सरस भक्ती गीत सादर करून दाद मिळवली यात प्रामुख्याने मंगलमूर्ती श्री गणराया, सुंदरते ध्यान, सुखाचे जे सुख, आकल्प आयुष्य, निजरूप दाखवा, माझे माहेर पंढरी, ये ग ये ग विठाबाई, सावळा ईश्वर, अवघा रंग एक झाला, काळ देहासी आला खाऊ, कमल नयन वाले राम, वेढा वेढा रे पंढरी, पद्मनाभा नारायणा, तेजोमय नादब्रह्म असे एकाहून एक सरस भक्ती गीते सादर झाली व शेवटी अगा वैकुंठीचा राया या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात प्रसन्न दाऊतखाने यांनी पूरक अशी हार्मोनियम साथ केली तर ऋतूपणा डांगे यांनी अत्यंत पोषक तबला साथ केली. नंदुरबारच्याच स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या या भक्तीमय गीतांचे रसिकांनी वेळोवेळी दाद देऊन कौतुक केले. या कार्यक्रमात प्रत्येक भक्तीगीता आधी अभ्यासपूर्ण निवेदन शशिकांत घासकडबी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीराम दाऊतखाने यांनी केले तर सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घासकडबी, डांगे, भावसार आदी कुटुंबियांनी विशेष सहकार्य केले. दोन तास संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.