*आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नंदुरबार आगाराच्या वतीने फराळाचे वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नंदुरबार आगाराच्या वतीने फराळाचे वाटप*
*आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नंदुरबार आगाराच्यावतीने फराळाचे वाटप*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यावर्षी नंदुरबार आगाराच्या वतीने सकाळी साडेपाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर तासाला बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीनिमित्त नंदुरबार आगाराच्या वतीने फराळासाठी केळी वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वासुदेव पवार, अशोक वळवी, वाहतूक निरीक्षक ऋषी पावरा, वाहतूक निरीक्षक देवेंद्र सिंग गिरासे, वाहतूक निरीक्षक सलीम मलिक, वाहतूक निरीक्षक साबळे, रमेश वळवी, महेंद्र आगळे, लक्ष्मण अहिरे, यश कोकणी, दिनेश गायकवाड, दिलीप गायकवाड, संतोष पवार, सुभाष भास्करे, सुभाष अहिरे, सुनील पाटील, दिपक पवार, सुकलाल माळी, संदीप जाधव, शेखर माळी, विनोद जाधव, प्रकाश बागुल,
प्रकाश बागुल, मोहन गढरी, गणशीराम सूर्यवंशी, चंद्रसिंग चौरे, सुधीर मोरे, सुनील मुंडे, रमण कोकणी आदी उपस्थित होते.