*के.डी.गावित प्राथमिक, विद्यामंदिर परिवर्धा येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल, रुक्मिणी व वारकरी संप्रदाय यांची वेशभूषा करत दिंडी सोहळा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.डी.गावित प्राथमिक, विद्यामंदिर परिवर्धा येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल, रुक्मिणी व वारकरी संप्रदाय यांची वेशभूषा करत दिंडी सोहळा*
*के.डी.गावित प्राथमिक, विद्यामंदिर परिवर्धा येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल, रुक्मिणी व वारकरी संप्रदाय यांची वेशभूषा करत दिंडी सोहळा*
शहादा(प्रतिनिधी):-के.डी.गावित प्राथमिक, विद्यामंदिर परिवर्धा येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल, रुक्मिणी व वारकरी संप्रदाय यांची वेशभूषा करून दिंडी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून पवनसिंग शेवाळे मुख्याध्यापक नवले सर तसेच प्रमुख पाहुणे रामेश्वर पाटील शा.व्या. समिती सदस्य सौ. कोकिळा पवार, सौ. दिपाली मराठे संगीता शेलार हे मान्यवर उपस्थित होते आषाढी एकादशीचे महत्व सांगितले आणि श्रीम. शितल मोरे यांनी वारकरी संप्रदायाबाबत माहिती दिली तसेच प्राथमिक, शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून, रिंगणात विठ्ठलाच्या नामाचा गजर करत नृत्य करुन दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला गावातील महादेव मंदिरात विठ्ठल रखुमाई बनलेल्या विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. मनिषा पाठक यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती. छाया पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.