*जी टी पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न*
*जी टी पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवी जळगाव डॉ एम जे रघुवंशी तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नीरज चौधरी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नंदुरबार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नीरज चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना सहकाराच्या माध्यमातून वाणिज्य क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी तसेच शासकीय योजना बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. न ता वि समितीचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य संबंधित आव्हानात्मक परिस्थिती बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांनी वाणिज्य मंडळाकडून वर्षभरात राबविले जाणारे कार्यात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन केले, तत्पूर्वी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ एस पी पाटील अंतर्गत गुणवत्ता विभागाचे डॉ एम आर पाटील उपस्थित होते प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ स्वप्नील मिश्रा यांनी मांडले सूत्रसंचलन प्रा एम बी पाटील यांनी तर आभार प्रकटन डॉ डी डी गावित यांनी मांडले केली. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ मनोज शेवाळे प्रा अफजल खाटिक, प्रा. नेहा पाटील, प्रा. पूजा ठाकरे, प्रा. पीनल परदेशी, प्रा. विजय गायकवाड, प्रा. अमोल पाटील व प्रा. दारासिंग वळवी यांनी परिश्रम घेतले.