*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी यांनी केली आहे
केलखाडी येथील शाळेच्या चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीवर पुल नसल्याने, नदीवर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव धोक्यात घालून नदीपार करून शाळेत जात असल्याने धोकेदायक असून आम्ही कार्यकत्यांसह याठिकाणी येऊन पाहणी केली असुन केलखाडी नदीवर त्वरीत पुल बांधण्यात यावा जेणेकरून केलखाडीसह, नयामाळ येथील चिमुकल्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी सोयीचे होणार आहे तसेच गुलाआबां ते केलखाडी नयामाळ दरम्यान रस्ता करण्यात यावा जेणेकरुन केलखाडी, नयामाळ येथील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी व रूग्णांला रूग्णालयात नेण्यासाठी सोयीचे होईल तरी गुलाआबा केलखाडी नयामाळ रस्ता व केलखाडी नदीवर पुल तयार करून चिमुकल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सोयीचे करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी यांनी शासनाकडे केली आहे यावेळी नाला सरपंच भुपेंन्द्र पाडवी, भाजपा मंडळ अध्यक्ष भुषण पाडवी, वैभव पाडवी, अविनाश पाडवी, रविकांत पाडवी, लक्ष्मण नाईक, दिलीप नाईक, अनिल वसावे, कांतीलाल वसावे, देविदास पाडवी, जगदिश नाईक, शिवदास वसावे, प्रशांत वसावे केलखाडी, गुलाआबा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.