*वाहतुकीचे नियम न पाळल्यास खबरदार, शाळा, महाविदयालय परिसरात विदयार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतुक करणारी वाहन धारकांवर विशेष कारवाई*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाहतुकीचे नियम न पाळल्यास खबरदार, शाळा, महाविदयालय परिसरात विदयार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतुक करणारी वाहन धारकांवर विशेष कारवाई*
*वाहतुकीचे नियम न पाळल्यास खबरदार, शाळा, महाविदयालय परिसरात विदयार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतुक करणारी वाहन धारकांवर विशेष कारवाई*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शहर वाहतुक शाखेतर्फे सुरू असलेल्या मोहिमेत तीन दिवसात 329 केसेस व 1लक्ष 50 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाढते अपघात, वाहन चोरी, वाहतुक कोंडी, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अशा विविध बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील विविध ठिकाणी मोहिम राबविण्यात येऊन कारवाई केली जात आहे. त्यामध्ये विशेषतः वर्दळीची ठिकाणे, शाळा, महाविदयालये परिसरात विदयार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतुक करणारी वाहने तसेच इतर वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील महात्मा गांधी पुतळा, नेहरु चौक, बस स्टॅन्ड परिसर, अंधारे स्टॉप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, साक्री नाका, इ. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोहिम राबविण्यात येऊन सर्व प्रकारचे वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असुन त्यामध्ये वाहतुक कोंडी करणे, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, वाहनाचे कागदपत्र सोबत न बाळगणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, रहदारीस अडथळा निर्माण करणे, विना इन्शुरन्स वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध सायलेन्सर वापरणे, इ. सदराखाली मोटार वाहन कायदयाचे वेगवेगळया कलामांतर्गत मागील तीन दिवसात एकुण 329 केसेस करण्यात येऊन त्यामध्ये 1 लक्ष 50 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, "जिल्हयात तसेच शहरात वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांविरुध्द यापुढे देखील वेळोवेळी वाहतुक शाखेतर्फे मोहिम राबविण्यात येऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिला आहे." सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी जगदीश गावित, पोउपनि जगदिश सुर्यवंशी, असई भानुदास बसावे, पोहेकॉ दिनेश वळवी, प्रविण पटेल, प्रविण मोरे, महेंद्र ठाकूर, पोना/प्रदीप वळवी, पोकों/सुनिल परदेशी, धनराज माळी, जिग्नेश पाडवी, योगेश पाकळे, तस्लीम शेख यांनी केली आहे.