*नंदुरबार येथे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व अखिल भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व वृक्ष वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व अखिल भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व वृक्ष वाटप*
*नंदुरबार येथे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व अखिल भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व वृक्ष वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या 112 वी जयंती वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व अखिल भारतीय बंजारा क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणी हिल येथील श्रावण चव्हाण यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजन व वृक्ष वाटप करण्यात आले. येथील कोकणी ही परिसरात वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व अखिल भारतीय बंजारा क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण व सौ ज्योती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी श्रावण चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हरित क्रांतीसाठी ज्यांनी राज्यात पुढाकार घेतला अशा वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपल्या परिसरात हरितक्रांती घडावी यासाठी आम्ही समाज बांधवांना वृक्ष वाटप केले. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने पाया घडविणारे स्वर्गीय नाईक यांचे विचार तळागाळातल्या समाज बांधवांपर्यंत नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. आजच्या राजकीय परिस्थितीला बघितल्यानंतर गर्वाने सांगावे असे वाटते की, नाईक साहेबांनी बंजारा समाजामध्ये जन्म घेतला आणि तो सार्थकी आणला. राज्यातल्या भल्या भल्या राजकीय नेत्यांना अथवा पक्षाला देखील आजपर्यंत नाईक साहेबांचे विक्रम मोडता आले नाही.
अशा या विक्रमादित्य महामानवाला अभिवादन करताना गर्वाने समाज बांधवांची छाती फुलून जात असते असे गौरवोद्गार चव्हाण यांनी काढले. यावेळी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ अशोक राठोड, माजी जिल्हाध्यक्ष करणसिंग चव्हाण, कर्मचारी नेते दिनेश राठोड, जिल्हा सचिव गणेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नितीन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष भटू बंजारा, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र चव्हाण, सल्लागार रवींद्र जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणजीत पवार, संत सेवालाल महाराज बंजारा लढताना तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य प्रेम चव्हाण, जितेंद्र पवार, चरणसिंग चव्हाण, चैत्राम राठोड, अमरसिंह चव्हाण, जीत बंजारा, सचिन चव्हाण सुजल चव्हाण, सुदर्शन चव्हाण, किसन पवार, भावेश पवार, देवा चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी प्रतिमापूजन केले.