*इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आवो गाव चले या आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आवो गाव चले या आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ*
*इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आवो गाव चले या आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा नंदुरबार तर्फे 1 जुलै डॉक्टर दिनानिमित्त आओ गाव चले या सामाजिक आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ इसाईनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमितकुमार पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर संजीव वळवी आदी उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ राजेश वसावे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व या अभियान फलकाची फीत कापून करण्यात आले याप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमास जिल्हा प्रशासनाची व आरोग्य यंत्रणेची मदत राहील असे आश्वासन दिले आहे. डॉ राजेश वसावे यांनी अध्यक्षीय समारोप करताना या उपक्रमाचे गरज पटवून दिली व यासाठी होणारे सर्व्हे, आरोग्य शिबिर यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले याप्रसंगी परिसरातील 15 सरपंच, माजी जि प सदस्य पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदी मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीपची माजी बांधकाम सभापती व समता विद्यालय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रीती सूर्यवंशी यांनी केले तरसूत्रसंचालन डॉ गणेश पाकले यांनी केले. डॉ स्वागत शहा यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आवो गाव चले प्रोजेक्ट समिती सदस्य डॉ भरत चौधरी, डॉ निशांत रंगरेज, डॉ सचिन खलाणे डॉ अश्विन पाटील यांनी यशस्वी संयोजन केले. या उपक्रमामुळे आरोग्य यंत्रणा प्रत्येक घरापर्यंत जाणार आहे याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.