*एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक, 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक, 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ*
*एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक, 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे, सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. वरील मुदतीनंतरही अशी पाटी न बसवलेली वाहने तपासणीदरम्यान आढळ्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.