*जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांना तसेच विशिष्ट एकल विशेषता (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) आणि महात्मा

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांना तसेच विशिष्ट एकल विशेषता (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) आणि महात्मा
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांना तसेच विशिष्ट एकल विशेषता (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांच्या पॅनलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोठा फायदा होणार असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत होतील.
योजनेचा उद्देश: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) : केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार पुरवते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये 1356 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.
पात्र एकल विशेषता रुग्णालये:. नाक, कान, घसा (ENT)
• नेत्रविकार (Ophthalmology)
• अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा (Orthopedic & Polytrauma), भाजणे (Burns), बालरोग शस्त्रक्रिया (Pediatric Surgery) कर्करोग उपचार युनिट्स (Oncology Units), नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स (Neonatal & Pediatric Medical Management Units) हिमोडायलिसिस - मूत्रपिंडशास्त्र युनिट्स (Maintenance of Hemodialysis (Nephrology) Units) या योजनेत 30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि वरील 10 खाटांची एकल विशेषता रुग्णालये सहभागी होऊ शकतात. या रुग्णालयांनी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्यात आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया आणि फायदे: पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील, ज्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च परवडणारा होईल आणि रुग्णांवरील आर्थिक भार कमी होईल. रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी:
https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी, नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील जिल्हा समन्वयक भ्रमणध्वनी क्रमांक 7304588202 किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांसाठी जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व पात्र रुग्णालयांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.